भिलवडी येथे पलूस प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून महापूराचा आढावा ; अनेक भागांना भेटी : लोकांना सूचना
भिलवडी परिसरातील लोकांकडून सतर्क राहू, वेळे प्रसंगी लगेच बाहेर पडू; असं आश्वासन

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी कृष्णा नदीला पावसाचा जोर वाढला असल्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. आज गुरुवार दिनांक 25 रोजी पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिटे पलूस पंचायत समितीचे बीडोओ अरविंद माने आणि प्रशासकीय अधिकारी यांनी भिलवडी परिसरातील भागांना भेटी दिल्या. तेथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, महापूर काळात घ्यावची काळजी याबाबत सूचना केल्या.
यापूर्वी भिलवडी बरोबरच परिसरातील अनेक गावांना महापुराचा तडाका बसला होता, गेल्या काही दिवसापासून कृष्णा नदी पाणी पातळीत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर पलूस च्या तहसीलदार दीप्ती रिटे , पलूस पंचायत समितीचे बीडीओ अरविंद माने यांनी भिलवडी येथील मौलानानगर, पंचशील नगर, साठे नगर, साखरवाडी , ब्रम्हनाळ, चोपडेवाडी सुखवाडी गावांना भेटी दिल्या.
पावसाचा जोर आणि कोयना धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे भिलवडी येथे पाणी पातळीत वाढ होणार आहे. यामुळे लोकांनी नेहमीप्रमाणे सुरक्षित स्थळी जावे, लोकांची राहण्याची, खान्याची. तसेच जनावरांच्या बांधण्यासाठी योग्य जागा यांची पाहणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली.
प्राथमिक आरोग्य बाबत लोकांना सुविधा पुरविणे, ग्रामपंचायत माध्यमातून कोणत्या सुविधा देता येईल, याबाबत ही सूचना तहसीलदार यांनी केल्या.
महापुर येण्यापूर्वी लोकांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी भिलवडी शिक्षण संस्थेचे खाजगी प्राथमिक शाळेचे वर्ग पाहिले, भारती विद्यापीठ चे खंडोबाची वाडी येथील वसंतराव दादा पाटील महाविद्यालयाची पाहणी केली.यावेळी भिलवडीच्या सर्कल सुनिता जाधव, तलाठी सोमेश्वर जायभाय, गौसमहंमद लांडगे, ग्रामसेवक कैलास केदारी, भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर शेख,
माजी उपसरपंच मोहन नाना तावदर, बाळासाहेब मोरे,सामाजिक कार्यकर्ते अमरजित कांबळे, पत्रकार पंकज गाडे, अभिजीत रांजणे, घनश्याम मोरे, डॉ विश्वजीत पतंगराव कदम जनसंपर्क कार्यालय भिलवडीचे अधिकारी सुहास अरबुणे , चौगुले ग्रामस्थ आदी उपस्थित होते.