आजरा येथील भूमीअभिलेख कार्यालयाचा ‘ निमतानदार””निवास पाटील( कसबा वाळवेकर) याला 6 हजार रूपयाची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार यांच्या आईचा मामा यानां वारस नसल्याने त्यांनी त्यांची मिळकत मूत्यूपत्राद्वारे तक्रारदार यांची आई ह्यात असताना त्यांच्या नावे केली होती. तक्रारदार यांच्या आईच्या मूत्यू नंतर त्यानां मूत्यू पत्राद्वारे मिळालेल्या मिळकती मधील आजरा तालूक्यातील चिमणी गावातील भू. क्र. 373 या मिळकतीच्या प्राॅपर्टि कार्ङाला वारसा हक्काने तक्रारदार यांचे तसेच त्यांचे वङील व भाऊ यांचे नाव लावण्या करिता आजरा येथील भूमीअभिलेख कार्यालयातील ‘ निमतानदार निवास वसंत पाटील वय 43 सद्या राहाणार सामंत बिल्ङिंग’ सरकारी दवाखाण्याजवळ आजरा. मूळ गाव कसबा वाळवे ता. राधानगरी याने तक्रारदार यांच्याकङे 6 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. ती लाच तक्रारदाराकङून स्विकारतानां लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकङले. याप्रकरणी आरोपी निवास पाटील याच्या विरोधात आजरा पोलिसात गून्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. बापू साळूंखे””सहाय्यक फौ. प्रकाश भंङारे””पोहे.काँ.सूनिल घोसाळकर”पो.ना. सचीन पाटील आदींनी केली.