ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडीच्या वाचन कट्ट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
उद्योगपती गिरीश चितळे यांची उपस्थिती

-
भिलवडी : सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने प्रत्येक महिन्याच्या एक तारखेच संपन्न होणारा वाचन कट्टा याही महिन्याच्या एक जुलैला संपन्न झाला. यास वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
-
माननीय गिरीश चितळे अध्यक्ष स्थानी होते या वाचन कट्ट्याचा विषय मी वाचलेले संत वाङ्मयाचे पुस्तक असा होता उपस्थित सर्व सभासदांनी या विषयावरती वाचलेल्या पुस्तकांबद्दल खूप छान व अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया नोंदवल्या श्रीयुत डी आर कदम यांनी स्वागत प्रास्ताविक केले श्रीयुत जय कृ केळकर यांनी आभार मानले वाचनालयाचे ग्रंथपाल वामन काटीकर सौभाग्यवती विद्याताई निकम सौभाग्यवती मयुरी नलवडे या वाचनालयाच्या सेवकांनी संयोजन केले पुढच्या एक ऑगस्ट 2024 यावेळी जेष्ठ विश्वस्त जी जी पाटील गुरुजी श्री उत्तम रमेश चोपडे श्रीयुत एके चौगुले नाना श्रीयुत जयदीप पाटील श्रीयुत हनुमंतराव दिसले सौभाग्यवती दिसले वहिनी व सभासद बंधू भगिनी उपस्थित होतेया 56 व्या वाचन कट्ट्यासाठी मी वाचलेले क्रांतिकारक किंवा स्वातंत्र्यसैनिक यांच्या संदर्भातल्या पुस्तकांवर चर्चा होणार आहे