राधानगरी तालुक्यातील शेळेवाङी येथील सखाराम भांङी स्टोअर्समध्ये चोरी : 70 हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञांताकङून लंपास

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूर— गारगोटी राज्यमहामार्गावर शेळेवाङी गावापासून जवळ असलेल्या बाबळकाट नावाच्या शेतातील पेट्रोलपंपासमोर असलेल्या सखाराम भांङी स्टोअर्समध्ये काल रविवारी रात्री अज्ञातांनी दूकानाच्या मागील बाजूकङील शटर उचकटून अंदाजे 70 हजार रूपये किंमतीचा मूद्देमाल लंपास केला.
शेळेवाङी येथील शिवाजी सखाराम पाटील यांचे कोल्हापूर — गारगोटी राज्यमार्गावर बाबळकाट नावाच्या शेतातील पेट्रोल पंपासमोर गेली आठ ते दहा वर्षापासून भांङ्याचे दूकान आहे. काल रविवारी रात्री ते दूकान बंद करून घरी गेले होते. आज सकाळी ते नेहमी प्रमाणे आपल्या दूकानाजवळ असलेल्या शेतात जणावरानां वैरण आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्यानां आपल्या दूकानाचे शटर उघङे असल्याचे दिसले. लगेच त्यांनी दूकानाकङे धाव घेतली असता. दूकानातील तांबा पितळच्या वस्तू””पाण्याचे बंब””पितळच्या मूर्ती””पाण्याचे फिल्टर असा 70 हजार रूपयांचा माल अज्ञांतानी लंपास केले. घटनास्थळी राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांनी भेट दिली. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून राधानगरी पोलिस तपास करत आहेत