सार्वजनिक वाचनालय भिलवडी संस्थेचा ५४ वा वाचन कट्टा उत्साहात
अध्यक्ष उद्योगपती गिरीश चितळे यांची उपस्थिती : वाचकांचा सहभाग

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेच्या वतीने एक जून 2024 रोजी ५४ वा वाचन कट्टा संपन्न झाला.
या वाचन कट्टा उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे होते प्रारंभी वाचन कट्टा कार्यवाहक सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले या वाचन कट्ट्यासाठी छत्रपती संभाजी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर महात्मा बसवेश्वर महात्मा गौतम बुद्ध या महान विभूतींच्या पुस्तकांवर उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या प्रारंभिक वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे आणि डी आर कदम यांचा पुरस्कार व वाढदिवसाबद्दल सत्कार करण्यात आला या वाचन कट्ट्यावर सुभाष कवडे प्रमोद कुलकर्णी हरा जोशी शरद जाधव सौ उर्मिला दिसले रमेश चोपडे हनुमंतराव दिसले मेजर उत्तम भोई हकीम तांबोळी सौ उमा कोरे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे शिंदे जी जी पाटील गुरुजी यांनी वाचलेल्या पुस्तकांवर आपल्या प्रतिक्रिया अभ्यासपूर्ण रीतीने नोंदविल्या शेवटी कार्यवाहक सुभाष कवडे यांनी आभार मानले एक जुलै 2024 रोजी 55 वाचन कट्टा मी वाचलेले संत वांग्मय या विषयावर घेण्याचे सर्वानुमते ठरले वाचन कट्टा उपक्रमाचे संयोजन ग्रंथपाल वामन काटीकर सौ विद्या निकम सौ मयुरी नलवडे यांनी सुभाष कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम रीतीने केले पुढील महिन्यापासून महिलांसाठी स्वतंत्र वाचन कट्टा सुरू करीत आहोत असे कार्यवाहक कवडे यांनी सांगितले