महाराष्ट्रराजकीय
सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारासाठी उद्योगपती सी आर सांगलीकर यांचा सहभाग
सोनी, भोसे, कळंबी, टाकळी, एरंडोली गावांतील कार्यकर्त्यांशी संवाद

मिरज : सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये उद्योगपती सी आर सांगलीकर यांचा आपल्या कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन मिरज पूर्व भागात मोठा सहभाग असून जोमात प्रचार सुरू आहे.
उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारासाठी उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी सोनी (ता. मिरज) येथून दौऱ्याला सुरुवात झाली. सोनी, भोसे, कळंबी, टाकळी, एरंडोली गावामध्ये पदयात्रा, बैठक, सभेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी लोकसभेचे उमेदवार विशालदादा पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्यासह कार्यकर्ते, नेते, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचारावेळी लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.