कोल्हापूरः अनिल पाटील
*घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर जीवबानाना नगर, जाधव पार्क कोल्हापूर. येथील सामाजिक बांधिलकीतून विविध लोकोपयोगी उपक्रम राबवणारे”जिवबानाना बॉईज ग्रुप” आयोजित रास दांडिया कार्यक्रमाचे उद्घाटन दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार एन.एस. पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले.*
*या वेळी दिनेश पाटील ,महादेव लवटे,संजय पाटील,प्रवीण पोवार,विश्वास पोवार,राहूल बर्गे,जीवन कांबळे,तसेच मंडळाचे कार्यकर्ते अमृत सुतार, घनश्याम शिंदे, प्रसाद पाटील, सर्वेश सुतार, अजय कदम, प्रथमेश घाटगे ,रोहित कदम, प्रसाद कुडाळकर, सुमित साळुंखे, अजय वाघमारे तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.*
*या नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस विविध उपक्रम दांडीया,संगीत खुर्ची,लिंबू चमचा,उखाणे,गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते घनश्याम शिंदे व प्रसाद पाटील यांनी दिली.*


