महाराष्ट्र संघाचा लक्षद्विप संघावर 4 गोलनी विजय”””तर””तेलंगना आणी आंध्रप्रदेश””आणी त्रिपूरा विरूद्ध अंदमान निकोबार यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत
77 वी संतोष ट्राॅफी फुटबाॅल स्पर्धा

कोल्हापूरः अनिल पाटील
– संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघानं लक्षव्दीपवर ४ -० असा एकतर्फी विजय मिळवला तर तेलंगना आणि आंध्रप्रदेश , त्रिपुरा विरुध्द आंदमान निकोबार यांच्यातील सामना गोल शून्य असा बरोबरीत राहिला.
छत्रपती शाहू स्टेडियम इथं संतोष ट्रॉफी फुटबॉल सामने सुरु आहेत. एफ गटातील हे सामने सुरु असून अखिल भारतीय फुटबॉल महासंघ, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा खेळवली जात आहे. आज सामन्याच्या दुस-या दिवशी सकाळच्या सत्रात महाराष्ट्र विरुध्द लक्षव्दीप यांच्यात सामन झाला. सामन्यात पूर्वार्धात आठव्या मिनिटाला अद्वेतने मैदानी गोल करत महाराष्ट्र संघाचे खाते खोललं, लक्षव्दीपनं गोलची परतफेड करण्यासाठी चढाया केल्या पण त्या व्यर्थ गेल्या. मध्यंतरास महाराष्ट्र १-० असा आघाडीवर होता. उत्तरर्धात महाराषट्र संघान जोरदार चढाया ६९ व्या मिनिटाला अर्नेश अन्सरीने लक्षव्दीपचा बचाव भेदत संघाचा दुसरा गोल केला, कर्णधार निखील कदम यानं ६८ व्या मिनिटाला गोल केला. हिमांशू पाटीलने ७८ व्या मिनिटाला संघाला चौथा गोल मिळवून दिला. संपूर्ण वेळेत चार गोलची आघाडी कायम ठेवत महाराष्ट्रानं हा सामना जिंकला. दुसरा सामना तेलंगना आणि आंध्रप्रदेश तर तिसरा सामान त्रिपुरा विरुध्द आंदमान निकोबार यांच्यातील सामना गोल शून्य असा बरोबरीत राहिला. मंगळवार १७ ऑक्टोबरला सकाळी साडेआठ वाजता लक्षव्दीप विरुध्द निकोबार, साडेअकरा वाजता त्रिपुरा विरुध्द तेलंगना आणि साडेतीन वाजता महाराष्ट्र विरुध्द अंदमान निकोबार यांच्यात सामना होईल