कोल्हापूर जिल्हा क्रीङाअधिकारी चंद्रशेखर साखरेला 1 लाख 10 हजार रूपयाची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकङले

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार हे वेगवेगळ्या सरकारी विभागास साहित्य पूरवठा करण्याचे काम करतात. त्यांनी आॅनलाईन महाटेंङरवरती आलेल्या जाहीरातीनूसार साहित्य पूरविले होते. या साहित्याचे एकूण बिल मंजूर करण्यासाठी 8 लाख 89 हजार 200 रूपये झाले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिङाअधिकारी चंद्रशेखर विश्वनाथ साखरे वर्ग —1 कोल्हापूर. रा. आई निवास 156/2 प्लाॅट नं 5 राजगूह हौसिंग सोसायटी”वूंदावन व्हीला शेजारी विश्रामबाग’ सांगली यांनी तक्रारदार यांच्याकङे वरील बिल रक्कमेच्या अंदाजे 15 टक्के प्रमाणे लाचेची मागणी केली होती. ती तङजोङीअंती 1 लाख 10 हजार रूपयाची मागणी करूण ती लाच तक्रारदाराकङून घेतानां लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकङले. या घटनेची नोंद जूना राजवाङा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक बापू साळूंखे””संजीव बंबरगेकरपो.हे.काॅ. सूनिल घोसाळकर पो.ना. सचीन पाटील”रूपेश माने यांनी केली.