चंदगङ पंचायत समितीत्या उपअभियंता श्रीमती सुभद्रा लक्ष्मण कांबळेला 25 हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार हे पोटमक्तेदार ठेकेदार असून त्यांनी मूळ ठेकेदार यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घूलेवाङी ता. चंदगङ येथील नळपाणी पूरवठा योजना सूधारीकरण करण्याचे काम घेतले असून तक्रारदार यांनी घूलेवाङी येथे केलेल्या जलजीवन पाणीपूरवठा कामाचे बिल मंजूर केले म्हणून आरोपी श्रिमती सूभद्रा लक्ष्मणराव कांबळे” पद उपअभियंता( वर्ग—1) ग्रामीण पाणीपूरवठा विभाग.पंचायत समिती चंदगङ” जिल्हा कोल्हापूर. सद्या राहाणार बेळगाव’ हनूमाननगर. यांनी तक्रारदाराकङे मंजूर केलेल्या 12 लाख रूपयांचे 3 टक्के दराने 33 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. ती तङजोङीअंती 25 हजार रूपये तक्रारदाराकङून घेतानां लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकङले.सध्या त्यांच्यावर चंदगङ पोलिसात गून्हा दाखल करण्याचे काम सूरू आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीव बंबरगेकर””पो.हे.काॅ विकास माने””सूनिल घोसाळकर””पो.हे.काँ पूनम पाटील” पो.ना. सचीन पाटील यांनी केली