जय भारत स्कूल””छत्रपती शाहू विद्यालय”” महाराष्ट्र स्कूल”” स.म. लोहीया संघ विजयी
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा क्रीङा अधिकारी कार्यालय आयोजित शालेय फुटबाॅल स्पर्धा

कोल्हापूरःअनिल पाटील
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित शासकीय शालेय मनपा स्तर फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात
जय भारत स्कूल”” छत्रपती शाहू विद्यालय””महाराष्ट्र स्कूल””भारती विद्यापीठ””स. म. लोहीया हायस्कूल संघ विजयी झालेत. स्पर्धेचा निकाल असाः
14 वर्षे मुले निकाल :
.जय भारत स्कूल विजयी विरुद्ध देशभूषण हायस्कूल 2/0 नी विजयी.आदर्श मार्गे 1, सुचित माने याने 1 गोल केला.
छत्रपती शाहू विद्यालय एसएससी विजय विरुद्ध विमला गोइंका इंग्लिश स्कूल 1/0 नी विजयी. हर्षवर्धन इजर याने 1 गोल केला.
महाराष्ट्र स्कूल विजय विरुद्ध न्यू मॉडेल संकेत जाधव याने 1, आणी साईराज पाटील याने 1 गोल केला.
भारती विद्यापीठ विजय विरुद्ध राधाबाई शिंदे 0/0 ट्राय ब्रेकवर भारती विद्यापीठ 3/1 गोलनी विजयी.
. स .म. लोहिया हायस्कूल विजय विरुद्ध शांतीनिकेतन 2/0 साईराज तीवले याने 1 गोल तर राजवर्धन पोखलेकर 1 गोल केला.
छत्रपती शाहू विद्यालय एसएससी विजय विरुद्ध जय भारत हायस्कूल 6/0 पृथ्वीराज पिसाळ, प्रज्वल काळे हर्षवर्धन इंजर, सादिक मुल्ला,वेदांत गाडगीळ, क्षितिज बारस्कर, प्रत्येकी एक गोल केला.19 वर्षाखालील मुली निकाल :
.विवेकानंद कॉलेज विजयी विरुद्ध न्यू मॉडेल 6/0 सौम्या कागले 2, निदा सत्तार मेकर 3, गायत्री धुंदरे हिने 1 गोल केला.
पोद्दार इंटरनॅशनल विजय विरुद्ध विद्यापीठ कॉलेज नंदिनी वासकर 1,मधुरिमा भोसले 1 गोल केला.
विवेकानंद कॉलेज विजयी विरुद्ध कमला कॉलेज 2/0 सौम्या कागले 1, नीता सत्तारमेकर 1 गोल केला.