क्राईम
धामोङ येथे सुतारकाम करत असताना कटर लागून एक जण जखमी

कोल्हापूरः अनिल पाटील
सूतारकाम करत असताना अचानक चेहर्यावर व खांद्यावर कटर लागून एक जण जखमी झाला. विश्वास आनंदा सूतार वय (35) रा. धामोङ. ता.राधानगरी असे त्याचे नाव आहे. ही घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सूमारास घङली.
जखमी विश्वास सूतार याचा वङीलापोर्जीत सूतारकामाचा व्यवसाय आहे. आज सकाळी तो सूतारकाम करत असताना त्याच्या चेहर्यावर व खांद्यावर कटर लागल्याने तो जखमी झाला.त्याला पूढील उपचारासाठी कोल्हापूरातील सी.पी. आर. रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.