राष्ट्रगीतेच्या भिलवडीतील ड्रायडेची दारू विक्री थांबणार का? की लोकांची अशीच दिशाभूल होणार ? कडक कारवाईची मागणी

पलूस:- सांगली जिल्हा पलूस तालुका भिलवडी येथे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. राष्ट्रगीताचे गाव ही म्हणून भिलवडी गाव हे नावारूपाला आले आहे. पण काही बहाद्दर, नेहमीच पुढाकार घेणारे ड्राय डे ला (राष्ट्रीय सण, उत्साहात दारूबंदी) विक्री करतात, असे लोकांत बोलले जात आहे आज 15 ऑगस्ट रोजी ड्राय डे असल्याने दारू विक्री होणार का थांबणार , की लोकांची दिशाभूल करणार असा, प्रश्न अनेकांतून निर्माण होत आहे. संबंधितांकडून कारवाई व्हावी, अशी मागणीही लोकांमधून होत आहे.
पलूस तालुक्यातील भिलवडी येथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. या गावात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. राष्ट्रगीताचे गाव ही म्हणून भिलवडी गाव सर्व परिचित आहे. परंतु काही लोक भिलवडी गावच्या विकासाला खीळ घालत असतात. काही महाशय आपल्या सोईसवडीप्रमाणे राष्ट्रीय सण, उत्साहात बिनधास्त आणि बिनबोभाट दारू विक्री करतात, हे कितपत योग्य आहे, एका बाजूला अनेक सामाजिक उपक्रम राबवून आणि भिलवडी गावातील काही लोकांकडून गावाचे नाव उंच भरारी घेत आहे. पण काही बहाद्दर लोकांकडून भिलवडी गाव बदनाम केले जात आहे, हे कुठेतरी थांबायला पाहिजे, हे होत नसेल तर संबंधित अधिकारी यांनी कारवाई करावी, अशी मागणी लोकांमधून होतं आहे.