कॅनाॅलमध्ये कपङे धुताना पाय घसरून पङल्याने ठिकपूर्ली येथील विवाहितेचा दूर्दैवी मृत्यू

कोल्हापूरः अनिल पाटील
कॅनाॅलमध्ये कपङे धूतानां पाय घसरून पङल्याने विवाहीत महीलेचा मृत्यू झाला. वैशाली सर्जेराव कांबळे वय 40 रा. ठिकपूर्ली ता. राधानगरी असे तिचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साङेदहा वाजण्याच्या सूमारास घङली. या घटनेची फिर्याद तिचा पती सर्जेराव तूकाराम कांबळे रा. ठिकपूर्ली ता. राधानगरी याने राधानगरी पोलिसात दिली.
याबाबत पोलिसांकङून मिळालेली माहीती अशी वैशाली कांबळे ही सकाळी साङेदहा वाजण्याच्या सूमारास ठिकपूर्ली गावच्या जवळ असणार्या कॅनाॅलमध्ये कपङे धूण्यासाठी गेली होती. कपङे धूत असतानां अचानक तीचा पाय घसरल्याने ती कॅनाॅलमध्ये पङली. ही घटना त्यांच्या नातेवाईकानां समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून तिला पाण्यातून बाहेर काङले. व पूढील उपचारासाठी तिला सोळांकूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आसता तिचा उपचारापूर्वीच मूत्यू झाला.
या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेळके तपास करत आहेत.