महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वादळ : डॉ विश्वजीत कदम
डॉ विश्वजीत कदम यांच्या भगत मळा व नेवरी येथील प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कडेगांव: पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांच्या भगत मळा व नेवरी येथील प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की काँग्रेसची विचारधारा व माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांचा वारसा सक्षमपणे जपत सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. ही विकासगंगा अशीच अखंड प्रवाहित ठेवण्यासाठी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता येत्या २० नोव्हेंबरला अ. क्र.१ समोरील ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा व पुन्हा एकदा जनसेवेची संधी द्या.निष्क्रिय भाजप व महायुती सरकारच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, शेतकरी उद्ध्वस्त झाले. स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय, बंधुभाव या तत्त्वांवर व शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित भारतीय संविधानाचा अवमान करण्याचे काम भ्रष्ट महायुती सरकार करत आहे. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वादळ आले आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, राज्याला पिछाडीवर घेऊन जाणाऱ्या महायुतीला पराभूत करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. पलूस-कडेगाव तालुक्यातील मतदारांनीही यामध्ये मागे राहू नये.
यावेळी युवा नेते सतीश आबा पाटील यांनी सांगितले की, पलूस कडेगावच्या विकासासाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या विकासासाठी डॉ. विश्वजीत कदम यांना निवडून द्या विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, नदीकडच्या भागांमध्ये महापुराच्या काळात विश्वजीत कदम यांनी जीवाचे रान करून मोठे कार्य केले आहे या कार्याची जाणीव नदीकाठच्या भागातील लोकांना आहे.
यावेळी ग्रामस्थ, कार्यकर्ते व महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.