किटलीने उडवली विरोधकांची झोप ; डॉ. मंगेश आमले यांच्या भव्य प्रचार महारॅलीने विरोधक घायाळ

मुंबई :- डॉ. मंगेश आमले 151 बेलापूर मतदार संघाचे एक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित नेतृत्व प्रत्येक घराघरात जाऊन पोचले आहेत. आणि जनतेचा प्रचंड पाठिंबा त्यांच्या पाठीशी आहे.
डॉ. मंगेश आमले यांच्या प्रचारार्थ रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी बेलापूर मतदार संघात भव्य प्रचार महारॅली आयोजित करण्यात आली होती. डॉ. मंगेश आमले यांच्या भव्य प्रचार महारॅलीने विरोधक घायाळ झाले आहेत.
या महारॅलीसाठी मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्याने विरोधकांची झोप उडवली आहे.
बेलापूर मतदारसंघात खऱ्या अर्थाने घराणेशाही, हुकुमशाही, खंडणीखोर आणि भ्रष्ट्राचार संपवून विकास साधायचा असेल तर डॉ. मंगेश आमले यांच्यासारखा सुशिक्षित आणि अभ्यासू चेहराच नागरिकांना नेतृत्व म्हणून हवे आहे.
दत्तगुरुनगर वाशी इथून सुरू झालेले ही महारॅली सानपाडा, जुईनगर, नेरुळ , सीवूड मार्गे बेलापूर येथील सप्तशृंगी मंदिरात दर्शन घेऊन संपन्न झाली.
स्वतःचा हक्काचा भाऊ म्हणून हजारो माता भगिनी या महारॅली मध्ये सहभागी झाल्या होत्या.
या महारॅलीतील असंख्य कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि डॉ. मंगेश आमले यांच्या समर्थक यांच्या