क्राईमग्रामीणमहाराष्ट्र
चांदेकरवाङी येथे भटक्या कुञ्याच्या हल्ल्यात बालिका जखमी

दर्पण न्यूज कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालूक्यातील चांदेकरवाङी येथे भटक्या कूञ्याच्या हल्ल्यात अंगणवाङीत शिकणारी तीन वर्षाची बालिका आदविका अक्षय खोत जखमी झाली ही. घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सूमारास घङली.
आदविका ही आपल्यादारामध्ये खेळत होती.अचानक तेथे भटके कूञे आले आणी आदविकेच्या छातीवर चावा घेतला. त्यावेळी तिने ओरङाओरङ केल्यानंतर तिच्या घरातील लोकांनी त्या कूञ्याला हटकले.त्यामूळे मोठा अनर्थ टळला. तिला पूढील उपचारासाठी मूरगूङ येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असल्याचे सूञाकङून समझते.
चांदेकरवाङी गावात भटक्या कूञ्यांचे प्रमाण जास्त असल्याने ग्रामपंचायतीने या गंभीर प्रकरणाकङे लक्ष देवून भटक्या कूञ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.