दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे ग्रंथालय चळवळीचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांची जयंती व ग्रंथपाल दिन समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
प्रारंभी विवेकानंद वाचनालय पलूस चे अध्यक्ष पांडुरंगजी पुदाले यांचे हस्ते डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी वाचनालयाच्या ग्रंथपाल मयुरी नलवडे यांचा ग्रंथ भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला.कार्यवाह सुभाष कवडे यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. कवडे यावेळी म्हणाले , वाचन चळवळीमध्ये ग्रंथपालांचे महत्त्व खूप आहे. ग्रंथपाल हा ग्रंथालय चळवळीचा महत्त्वाचा घटक आहे. उत्तम पुस्तकाला उत्तम वाचक आणि उत्तम वाचकाला उत्तम पुस्तक देण्याचे काम ग्रंथपालांच्याकडून होत असते. डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी वाचन चळवळ सुरू करून समाजाला खऱ्या अर्थाने सुसंस्कृत करण्याचा पायाच घातलेला आहे. गावोगावची वाचनालय गाव समृद्ध करत असतात. याच्यामध्ये डॉक्टर एस आर रंगनाथन यांचे नाव प्रामुख्याने अधोरेखित करावेसे वाटते ग्रंथपालांमुळेच गाव वैचारिक दृष्ट्या समृद्ध होत असतात. यावेळी वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्या निकम यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. आभार कार्यवाह सुभाष कवडे यांनी मानले.
