

दर्पण न्यूज पलूस भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील वसगडे येथील ज्येष्ठ नेते नरसगोंडा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मानसिंग बँकेचे संस्थापक जे के बापू जाधव यांनी सत्कार केला.
यावेळी ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र पवार, रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव प्राध्यापक जी एस खोत , क्रांती सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय पवार, कुंडल गावचे नारायण बापू दिवटे ,पलूसचे उद्योजक धनाजी शेंडगे बापू, जाधव सर , वसगडे गावचे माजी उपसरपंच संपतराव पवार , संग्राम पवार, बादशहा पट्टेकरी, जयपाल शिरोटे, क्रांती अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी पलूस चे चेअरमन धन्यकुमार पाटील गोविंद पवार, पत्रकार हरूण मगदूम, पत्रकार अभिजीत रांजणे, संग्राम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
नेहमीच जे के बापू जाधव आपल्या मित्र परिवारांचा आदर सन्मान करीत असतात. आजही असाच सन्मान वसगडे येथील ज्येष्ठ नेते नरसगोंडा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला. यावेळी अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
