
दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी( शिराज शिकलगार) :-सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहर पोलीस ठाणे हद्दीत एका चारचाकी वाहनाची आणि दुचाकी मोटरसायकलची समोरून समोर धडक, घटनास्थळी नागरिकांतून मिळालेली माहिती अशी की, काल दुपारच्या वेळेत रेणावी येथून आपल्या मलकी हक्काच्या दुचाकी मोटारसायकलवरून सोनाली पाटील ,व तेजस यादव हे दोघे बहीण व भाऊ हे विटयाकडे येत असताना, व विटयाहून आपल्या मलकी हक्काची चारचाकी गाडी ही रोहन संजय ढोंबळे हा खानापूर च्या दिशीने सुसाट वेगाने जात असताना, बळवंत काॅलेज समोरील ओढ्याच्या वळणावर ही दोन्ही वाहने आल्यानंतर या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोराची धडक झाली , अक्षरशः या दोन्ही वाहनांच्या धडकेत मोटारसायकल ओढ्या पात्रात फेकली गेली, हा अपघात इतका भीषण होता की, या दोन्ही वाहनांची धडक झाल्यानंतर मोटारसायकलच्या चुराडा झाला तर मोटारसायकलवरील तेजस यादव ( वय वर्षे १८) व सोनाली पाटील ( वय वर्षे २९) ,हे भाऊ बहीण गंभीर जखमी झाले आहेत,या अपघाताचा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली,व जखमी अवस्थेत असलेल्या या भाऊ _बहिणींला विटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नागरिकांनी दाखल केले, अक्षरशः दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे, तर या घटनेची माहिती विटा पोलिसांना मिळाल्यानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली,या अपघातानंतर विटा बळवंत काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी व रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी मोठी मदत केली, हा अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही, सदर विटा पोलीस घटनास्थळी दुपारी उशिरा पंचनामा करत होते, सदर विटा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत आजूबाजूच्या नागरिकांतून या अपघाताची माहिती विटा पोलीस घेत होती.तर या अपघातात भाऊ-बहीणच गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी व अन्य यांनी हळूहळू व्यक्त केले, विट्यातील खानापूर रोड येथील बळवंत कॉलेज समोरच कॉर्नरला आय ट्वेन्टी आणि मोटरसायकल ची धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली.
