
दर्पण न्यूज पलूस :- आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या शुभहस्ते नागराळे येथील रस्ता काँक्रीटीकरणासाठी मंजूर १० लाख रुपये निधीच्या विकासकामाचे उद्घाटन झाले.
यावेळी त्यांनी ज्योतिर्लिंग मंदिराच्या सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला .तसेच कामे दर्जेदार व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्रअप्पा लाड, स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
