दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
तामलवाडी पोलीस ठाणे- तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आटोळे यांना तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाला (गुटखा)ची अवैध वाहतुक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने. तामलवाडी पोलीस ठाण्याचे पथकाने दि.17.07.2026 रोजी 03.30 वा. सु. तुळजापूर सोलापूर हायवे माळुंब्रा गावाजवळ सापळा रचून थांबले असता पथकास मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट मोटार कार क्रमांक MH-46-P-3471 ही येताना दिसल्याने नमुद कारला संशयावरुन थांबवून कार मधील अशोक गोरख गिते, वय 24 वर्षे, मंजरी घाट पो पाचगरी ता. पाटोदा जि. बीड यांना विचारपुस केली असता त्याने पथकास उडवा-उडवीची उत्तरे दिली. यावर पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांनी कारची झडती घेतली असता एकंदरीत त्या कारमधून एकुण 1,540 केसरयुक्त विमल पान मसाला पुडे, व्ही 1 तंबाखु 1,650 पुडे असा 3,04,220 ₹ किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ वाहून नेत असल्याचे आढळले. यावर पथकाने नमूद गुटखा व वाहतुकीस वापरलेली कार असा एकुण 8,41,220 ₹ चा माल जप्त करुन नमूद गुटखा हा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत असल्याची खात्री करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन अशोक गोरख गिते, वय 24 वर्षे, रा. मंजरी घाट पो पाचगरी ता. पाटोदा जि. बीड यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 123, 223, 274, 275 सह 26(2) (iv), 27(3)(d), 27(3)(e) सह वाचन कलम कलम 30(2)(अ) कलम भंग करुन शिक्षापात्र 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अन्वये पो.ठा. तामलवाडी येथे गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास तामलवाडी पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मनोहर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे, पोउपनि प्रदीप टेकाळे, पोह 1523/ सुरज नरवडे, पोह/484 नितीन भोसले, पोना/1423 गोबडे, पोअ/311 सलगर यांचे पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
तामलवाडी पोलिसांनी नागरिकांना महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री, साठवणूक अथवा वाहतूक याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
