दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी( संतोष खुने) :-
कळंब पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा क्र.115/2015, गुन्हा क्र.287/2026, गुन्हा क्र.286/2026, कर्नाटक पासिंगची twister मोटरसायकल असे एकुण चार मोटरसायकल या पोलीस ठाणे कळंब हद्दीतुन चोरीस गेल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद गुन्हे नोंदवलेले आहे.
सदर गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर व कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पो.ठा. च्या पोनि- श्री. शेख, पोलीस हवालदार अजीज शेख, जुबेर काझी, पोलीस अंमलदार- परमेश्वर कदम, अमोल माळी, यांच्या पथकाने कौशल्यपुर्ण तपास केला. यात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कळंब ता. कळंब जि. धाराशिव येथील-लखन उर्फ रमेश उत्रेश्वर दळवी, यास ताब्यात घेउन त्याचे कडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे गुन्हे केल्याची कबुल करुन त्याने चोरी केलेली चार मोटरसायकल असा एकुण 70,000 ₹ किंमतीच्या नमूद चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेउन त्यास अटक केली असुन गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.
