दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :- विटा, दि. 01 जुलै 2026 : विटा नगरपरिषद हद्दीतील भवानी माळ , नेवरी नाका परिसरातील गट क्र. 301/24/ड येथील बांधकामास मंजूर बांधकाम परवानगीच्या अटी व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील तरतुदींचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
सदर प्रकरणी संबंधित मालकास वेळोवेळी नोटीस देण्यात आली तसेच अनधिकृत बांधकाम थांबविणे व नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही संबंधिताने अनधिकृत बांधकाम सुरू ठेवून नोटिशींचे पालन न केल्याने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 52 व 53 अंतर्गत कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0284/2026, दिनांक 01/07/2026 रोजी संबंधित मालक सतीश शंकरराव पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.
विटा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याकडून आवश्यक बांधकाम परवानगी घेऊनच बांधकाम करावे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील तरतुदीनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.