

दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार ) :-विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून आणि वाईट व्यसनापासून दूर राहावे. सुसंस्कारातूनच उज्वल भविष्याची निर्मिती असते, असे पोलिस मित्र शिराज शिकलगार यांनी आपले मत व्यक्त केले. ते विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनिअर कॉलेज विटा या ठिकाणी पार पडलेल्या विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.
शिकलगार म्हणाले ,आजचे युग हे मोबाईल युग म्हणून संबोधले जाते या युगात मोबाईलचा दुरुपयोग तरुण पिढी करताना दिसते आहे. त्याचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर झालेला आपणास दिसून येतो यामुळे विद्यार्थी वाईट सवयीना आणि एखाद्या गंभीर गुन्ह्यात अडकण्याची दाट शक्यता असते , त्यामुळेच विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून आणि वाईट व्यसनापासून दूर राहावे. विद्यार्थ्यांनी आपल्या नित्य अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या आई-वडिलांचा मान राखला पाहिजे. कोणत्याही बाह्य प्रलोभनाला बळी न पडता आपल्या आई-वडिलांच्या वर प्रेम केले पाहिजे. आणि त्यांनी केलेले सुसंस्कारच आपले भवितव्य घडवू शकते असे त्यांनी सांगितले.
एखादा मुलगा किंवा मुलगी यांनी जर एखादे वाईट कृत्य केले तर पोक्सो कायद्याअंतर्गत काय शिक्षा असते हे त्यांनी मुलांना समजून सांगितले.
शाळेत किंवा बाहेर समाजात फिरत असताना आपल्याकडे शिस्त असणे तसेच कायद्याने घालून दिलेले नियम किती महत्त्वाचे असतात हेही त्यांनी सांगितले. सिराज शिकलगार यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत पोट तिडकेने आपले विचार समजून दिले
तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनिअर कॉलेज विटा कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री. एच. एस. जाधव सर यांनी कार्यक्रमाचेअध्यक्षपद भूषवले. कार्यक्रमासाठी कॉलेजचे उपप्राचार्य श्री काळे ए. जे. यांच्याबरोबर कॉलेजचे शिक्षक बंधू भगिनी , आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील एस. बी. यांनी तर आभार श्री लाढाने डी.डी. यांनी मानले.