दर्पण न्यूज पलूस भिलवडी — सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेने शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून संस्थेने यशाचा नवा इतिहास रचला आहे. इयत्ता ५ वी व ८ वी च्या तब्बल 22 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड . सांगली जिल्ह्यामध्ये 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत एकाच शिक्षण संस्थेचे जिल्हा गुणवत्ता यादीत 12 विद्यार्थ्यांची निवड जिल्ह्यात अव्वल ठरली .तर 8 वी स्कॉलरशीप परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत सारंग कुलकर्णी राज्यात १२ वा ठरला. भिलवडी शिक्षण संस्थेचे माननीय अध्यक्ष विश्वासजी चितळे साहेब यांच्याकडून सर्व गुणवंतांना 22 सायकली बक्षीस म्हणून जाहीर.
भिलवडी, प्रतिनिधी : भिलवडी शिक्षण संस्थेचे आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, भिलवडी व इंग्लिश प्रायमरी & हायस्कूल भिलवडी यांनी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा–२०२६ मध्ये घवघवीत यश संपादन करत गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. यंदा दोन्ही वर्ग मिळून तब्बल 22 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
इयत्ता ८ वीच्या परीक्षेत सारंग शंतनू कुलकर्णी याने २७२ गुणांसह राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत १२ वा क्रमांक पटकावत शाळेचे नाव राज्यभर उज्ज्वल केले. तसेच आर्यजीत विनोद पाटील (२५६ गुण) – जिल्हा गुणवत्ता यादीत १६ वा, अनुष्का श्रीकृष्ण जंगम (२५२ गुण) – २१ वी, नक्षत्रा सुदर्शन उपाध्ये (२४८ गुण) – ३२ वी, आराध्या प्रमोद डिसले ( २२६ गुण)- १०५वी , अन्वेशा प्रदीप खुबीकर (२२२ गुण) – १२७ वी, समिक्षा शशिकांत पाटील ( २१६ गुण )- १७०वी, ईश्वरी विजय पाटील (२०८ गुण) तालुक्यात ३री तर जिल्हा ग्रामीण एस.सी. प्रवर्गातून स्वरा सचिन आरते (२१० गुण ) ,मयुरेश संजय मोरे ( १७८ गुण ) मिळवून तालुक्यात प्रथम म्हणून निवड झाली.
इयत्ता ५ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पालवी प्रशांत शेटे (२५६ गुण) – जिल्हा गुणवत्ता यादीत ३८ वी, सार्थक अमोल कोळेकर (२५४ गुण) – ४५ वा, युगंधर अजित सलगर (२५२ गुण) – ५३ वा, आचल दीपक चौगुले (२४८ गुण) – ६७ वी, साहिर वाहिद संदे (२४६ गुण) – ७८ वा, आरूष सावणा गडदे (२४२ गुण) – ११३ वा, नरेश विनोद हुलवान (२४० गुण) – १४२ वा, राजवीर रोहित गुरव (२३६ गुण) – १८९ वा, निधी सुदर्शन उपाध्ये (२३२ गुण) – २१७ वी, तनिष्का भास्कर माने (२३२ गुण) – २२५ वी, माही आकाश शेटे (२३० गुण) – २३९ वी आणि सानवी सचिन निकम (२३० गुण) – २४४ वी क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम राखली.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख श्री शंकर केंगार सर , विभागप्रमुख श्री.ज्ञानेश्वर भगरे, श्री. राजू आरते, श्री. दिग्विजय मोकाशी, सौ. पौर्णिमा धेंडे, कु. अश्विनी गुणाले, श्री. सुनील भोये, श्री. प्रल्हाद पोवार, सौ. विद्या रोडे, श्री. अविनाश जगताप आणि श्री. प्रविण पलमटे , सौ.उज्वला हजारे
सौ.अदिती देशपांडे
सौ.शीलप्रभा किणीकर यांनी सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वासजी चितळे साहेब यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर सायकल भेट देण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करणेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा.विश्वास चितळे साहेब, डाॅ. मंदार तेंडोलकर ,विश्वस्त अशोक तात्या चौगुले, संचालक मुकुंद जोग, संभाजी सुर्यवंशी, चंद्रकांत पाटील, महावीर वठारे गुरुजी , सचिव मानसिंग हाके, सहसचिव के.डी.पाटील, मुख्याध्यापक संजय मोरे, उपमुख्याध्यापिका सौ.ए.एस.शिंदे , प्रभारी पर्यवेक्षिका रौनक तांबोळी, इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.टोणपे ,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच भिलवडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून अभिनंदन होत असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.