दर्पण न्यूज भिलवडी (अभिजीत रांजणे) : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज, बुरुंगवाडी यांनी पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा ठसा उमटविला आहे. विद्यालयातील एका विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असून पाचवी व आठवीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत तब्बल १२ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कु. वैष्णवी लक्ष्मण यादव हिने २६८ गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत दहावा क्रमांक पटकावून विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा खोवला आहे.
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस ३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २६ विद्यार्थी पात्र ठरत विद्यालयाने ८३.८७टक्के निकालाची नोंद केली. आठवीच्या परीक्षेस २८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १९ विद्यार्थी पात्र ठरून ६७.८५ टक्के निकाल लागला. पाचवीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत अनया सचिन जाधव (८९ वी), अर्णव सुनील कारंडे (१०७ वा), जान्हवी सुनील मगदूम (१६८ वी), संस्कार अविनाश कदम (१७३ वा) व अवनीश सागर पाटील (२२७ वा) यांनी स्थान मिळविले.
आठवीच्या जिल्हा गुणवत्ता यादीत अन्विशा अभिजीत चौगुले (४३ वी), हर्षल निवास गाडवे (६० वा), राधिका अजित मानुगडे (८२ वा), पृथ्वीराज संदीप पाटील (१६२ वा), योगेश्वरी नितीन यादव (१६८ वी), श्रेया संजय साळुंखे (१७२ वी) आणि श्रेया संदीप पाटील (१८८ वी) यांनी गुणवत्तायादीत झळकण्याचा मान मिळविला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुनील (बापू) जाधव, कार्यवाह सौ. वनिता जाधव यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना रमेश हजारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेचविषय शिक्षक अर्चना शिंदे, प्रियांका ढाणे, धनश्री पाटील, शिल्पा मगदूम, स्वाती मोकाशी व विशाखा दळवी यांनी परिश्रम घेतले.
मुख्याध्यापिका दिपाली जाधव, प्राचार्या स्वाती पाटील आणि विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन झाल्याची भावना संस्थेने व्यक्त के ली. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून विद्यार्थी, शिक्षक व संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव