दर्पण न्यूज मिरज / सांगली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, शिराळा, (तळीचा कोपरा शिराळा) येथे सन २०२६-२७ करिता अनुसूचित जाती १५ जागा, आर्थिकदृष्ट्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्ग ०१ जागा, विशेष मागासवर्गीय प्रवर्ग ०१, अनाथ १ व अपंग ०२ जागा अशा एकूण २० रिक्त जागांवर मुलांना विनामूल्य ऑनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरी गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करून अर्जाची प्रत व कागदपत्रे वसतिगृहात जमा करावीत, असे आवाहन वसतिगृहाचे अधिक्षक विक्रमसिंह पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात तळीचा कोपरा शिराळा तालुका जवळील शाळा व महाविद्यालयात इयत्ता ०८ वी, ०९ वी, १० वी, ११ वी, प्रथम वर्ष डिप्लोमा / आयटीआय, प्रथम वर्ष बी.ए/बी.कॉम/ बी.एससी/अभियांत्रिकी पदवी/ इतर पदवी कोर्सेस, प्रथम वर्ष कोणतीही उच्च पदवी व प्रथम वर्ष पदविकाचे नियमित शिक्षण घेत असलेल्या बाहेरगावाकडील/ परगावावरुन ये-जा करणाऱ्या/ (शिराळा स्थानिक विद्यार्थी सोडून) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन https://hmasnew.mahait.org/ या पोर्टलद्वारे सुरू आहे.
या शासकीय वसतिगृहात पुढीलप्रमाणे सोईसुविधा दिल्या जातात – विनामूल्य निवास व भोजन/आहार, प्रशस्त इमारत, कॉम्प्युटर लॅब, वायफाय, आरओ वॉटर, पुस्तके स्टेशनरी इत्यादिकरिता रू. 4000/- व दरमहा निर्वाह भत्ता रक्कम रूपये 1000/- आधारलिंकीत विद्यार्थ्यांच्या बचत खात्यावर जमा, शैक्षणिक सहलीत सहभाग असल्यास /सहलीला गेल्यास खर्च रूपये 2000/- पर्यंतची रक्कम बचत खात्यावर जमा करण्यात येते. विद्यार्थ्यांला गणवेश लागू असल्यास/ गणवेश खरेदी केला असल्यास प्रती विद्यार्थी 02 जोड प्रमाणे गणवेश खर्च रूपये 2000/- व अॅप्रन/बॉयलर सुट रूपये 500/- रक्कम बचत खात्यावर जमा करण्यात येते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दि. 26 जुलै 2011 च्या सहपत्रानुसार सोई सुविधा पुरविल्या जातात. अधिक माहितीसाठी वसतिगृहाच्या 02345-272644 व 8888600909 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.