दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्रातील नामवंत वक्ते, लेखक, प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी सार्वजनिक वाचनालय भिलवडी वाचनालयास नुकतीच सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी वाचनालयास चार लाख रुपये ची पुस्तके नुकतीच भेट दिलेली आहेत. या ग्रंथ भेटीबद्दल त्यांचा वाचनालयाच्या वतीने अध्यक्ष गिरीश चितळे यांचे हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी मिलिंद जोशी यांनी भेट दिलेल्या पुस्तकांचे छोटे खाणी प्रदर्शनी ही भरवण्यात आलेले होते. वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी प्रारंभी स्वागत करून या ग्रंथ भेटीबद्दल मिलिंद जोशी सर यांचे आभार मानले. आणि ही ग्रंथ भेट वाचनालयाचे ग्रंथालय समृद्ध करणारी असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष डी आर कदम ग्रंथपाल मयुरी नलवडे सौ विद्या निकम वाचनालयाचे विश्वस्त संचालक मंडळ आणि वाचक बहुसंख्येने उपस्थित होते.
अध्यक्ष गिरीश चितळे यांनी समारोप करून सर्वांचे आभार मानले .
यावेळी मिलिंद जोशी सर यांनी भिलवडी वाचनालयास मी अखेर पर्यंत पुस्तके भेट देणार असल्याचे जाहीर केले . यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक नवनाथ गोरे यांची विशेष उपस्थिती होती.