
दर्पण न्यूज भिलवडी :
भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष उद्योगपती नानासाहेब चितळे यांच्या वाढदिवसा निमित्त भिलवडी शिक्षण संकुलात एकशे एकावन्न वृक्षांची लागवड करण्यात आली. उद्योजिका सौ.स्मिता चितळे (चितळे डेअरी भिलवडी स्टेशन)यांच्या कल्पनेतून व सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी उद्योगपती नानासाहेब चितळे,भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे,सौ.स्मिता चितळे, ऋचा चितळे,ईश्वरी चितळे, राजसी चितळे,कृष्णराज चितळे आदी चितळे परिवारातील चार पिढीतील सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
भिलवडी शिक्षण संस्थेच्या विकासात नानासाहेब चितळे यांच्यासह सर्व परिवाराचे महत्वपूर्ण असे योगदान आहे.परिवारातील सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त भिलवडी शिक्षण संस्थेस देणगी देण्याची आदर्शवत परंपरा चितळे परिवाराने निर्माण केली आहे.
यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके,संचालक मुकुंद जोग,अजय चौगुले,मुख्याध्यापक संजय मोरे, उपमुख्याध्यापक प्रताप पाटील, सुकुमार किणीकर,प्रा.महेश पाटील,प्रा.मनिषा पाटील,प्रा.अनुराधा शिंदे, सौ.विद्या टोणपे,स्मिता माने, रौनक तांबोळी,सौ.उमा कोरे,शंकर बल्लाळ,सुचेता कुलकर्णी,डॉ.सी.व्ही.कुलकर्णी, दत्ता उतळे आदी उपस्थित होते.