

दर्पण न्यूज विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :-सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा पोलीस ठाणे हद्दीत विटा उपविभागिय पोलीस अधिकारी विपूल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी यांनी विटा वाहतूक नियंत्रण शाखेचा पदभार स्वीकारला आणि विटा शहरातील मायणी रोड,खाऊ गल्ली, कराड रोड,गांधी चौक, खानापूर रोड, विटा बस स्थानक परिसरात,तसेच विटा नविन भाजी मंडईत,व सांगली रोड , या ठिकाणी व मार्गावर रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या तसेच वाहतुकीचे नियम तोडून रस्त्यावर वाहने उभा करणाऱ्या वाहनांवर, व विटा शहरातील सोमवार आणि गुरुवार आठवडा बाजाराच्या पार्श्वभूमीवर वाहतूक घोड्याने अपघातांना आळा घालण्यासाठी विटा पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेने विशेष मोहीम राबवली या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनवर तसेच मद्य प्राशन करून गाडी चालवणे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, व अल्पवयीन चालक , अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, विटा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी वाहतूक नियंत्रण शाखेचे वाहतूक पोलीस पथकाने धडाकेबाज कारवाई करत वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनेक वाहन धारकावर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करणे. दुकानासमोर पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे. नो पार्किंग क्षेत्रात वाहने लावणे. नो एंट्री तून वाहन घेऊन जाणे , विना हेल्मेट दुचाकी चालवणे, अल्पवयीन चालक गाडी चालविणे. आशावर ही कारवाई करण्यात आली नियम भंग करणारे वाहने उचलून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी दैनिक प्रीतीसंगमचे प्रतिनिधी शिराज शिकलगार यांना माहिती देताना म्हटले की, विटा शहरातील बाजाराच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, यावेळी विटा वाहतूक नियंत्रण शाखेचे वाहन सतत दैनंदिन व आठवडा बाजार रस्त्यावर जनजागृती करून नागरिकांना सूचनाही देत असतात, काही वांधारक रस्त्यावरच वाणी उभी करत असल्याने वाहतूक कोडी होऊन अपघाताचा धोका वाढतो त्यामुळे सुरक्षितेसाठी वाहनधारकांनी वाहने नियोजित पार्किंग मध्येच उभी करावीत, प्रत्येक सोमवारी व गुरुवारी तसेच अन्यवेळी अशीच विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले, तसेच वाहनधारकांनी रस्त्यावर वाहने चालवताना मोबाईल वरती बोलणे टाळावे, उरट्या करण्याचा प्रयत्न करू नये, वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे, व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी यांनी सांगितले.
————-
विटा पोलीस ठाणे हद्दीत विटा वाहतूक नियंत्रण शाखेला एक हात वाहतूक नियंत्रण शाखा वाहतूक पोलीसांना मदतीचा म्हणून, निस्वार्थपणे कोणतीही अपेक्षा न ठेवता, सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र अध्यक्ष संस्थापक अजित दादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस मित्र जेष्ठ पत्रकार शिराज शिकलगार हे सुद्धा नेहमीच विटा वाहतूक नियंत्रण शाखेकडील वाहतूक पोलीसांच्या गाडीतून वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी व वाहतूक पोलीस यांच्याबरोबर गाडीतून स्पीकर वरून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनधारकांना सतत सूचना करत असतात त्यामुळे विटा शहरात सुद्धा अत्यंत सुविधा उपलब्ध चांगली झाली आहे, व या जनजागृतीमुळे काही वाणधारक रस्त्यावर दंड होईल म्हणून वाहन लावत नाहीत.
____