दर्पण न्यूज पलूस भिलवडी प्रतिनिधी (अभिजीत रांजणे) :-
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी भिलवडी येथील आपल्या तीन वर्षांच्या कालावधीत दमदार कामगिरी बजावली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपल्या सहकारी पोलिस कर्मचारी यांच्या साहाय्याने भिलवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोकांना न्याय दिला आहे. काहींना चांगले तर काहींना वाईटही अनुभव आले असतीलही, परंतु चष्मे वेगळे अनुभवही वेगळे असणार आहे.
कर्तृत्ववान पोलिस अधिकारी यांच्या केलेल्या कामगिरीवर जरा नजर टाकली तर त्यांची हटकेच कामगिरी दिसणार आहे.
पोलिस अधिकारी यांचा कार्यकृती अहवाल
कार्यकाल– दि.20.06.2024 रोजीपासून आज पावेतो पुढील प्रमाणे आहे.
1) अधिकायाचे नांव व पदनाम– भगवान पालवे, सहा.पोलीस निरीक्षक
चोरी, घरफोडी गुन्हे उघडकीस –
1) भिलवडी पोलीस ठाणेचा कार्यभार स्विकारलेनंतर पोलीस ठाणे हद्दीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणेत आली. ऑगस्ट 2024 मध्ये मोटारसायकल चोरट¬ास ताब्यात घेवून सांगली जिल्ह्रातील तसेच इतर जिल्ह्रातील एकुण 22 मोटारसायकल हस्तगत करून मोटारसायकल चोरीचे एकुण 22 गुन्हे उघडकीस आणले.
2) दिनांक 28.02.2025 रोजी बीड जिल्ह्रातील आरोपीस शिताफिने पकडून भिलवडी पोलीस ठाणे, आष्टा पोलीस ठाणे व शिरोळ पोलीस ठाणे जि.कोल्हापुर येथील एकुण 03 चोरीचे गुन्हे उघड करून यातील आरोपीत मजकुर याचेकडून एकुण 7,00,539 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला.
3) दिनांक 28.02.2026 रोजी गोपणीय बातमीदारामार्फतीने माहिती घेवून जत ता.जत, जि.सांगली येथील आरोपीत मजकुर यास ताबेत घेवून भिलवडी पोलीस ठाणे व शिरोळ पोलीस ठाणे जि.कोल्हापुर येथील एकुण 02 चोरीचे गुन्हे उघड करून आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करणेत आला.
4) सण 2022-2023-2024-2025-2026 या कालावधीमधील बाजारपेठ, एस.टी.स्टँण्ड, प्रवासादरम्यान नागरिकांचे गहाळ झालेले तब्बल 22 मोबाईल हँण्डसेटचा तांत्रिक माहितीचे आधारे शोध घेवून मोबाईलचे मुळ मालकांस परत करणेत आले.
5) मा.पोलीस अधीक्षक साो सांगली, मा.अपर पोलीस अधीक्षक साो सांगली, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी साो तासगाव विभाग तासगाव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्रांचा तपास करून यशस्वीरित्या गुन्हे उघडकीस आणणेत आलेले आहेत.
आंदोलन, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे –
1) वसगडे ता.पलुस येथील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकरी यांचे आंदोलन व्यवस्थितपणे हाताळून आंदोलन शांततेत पार पाडले. सदर ठिकाणी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.
2) भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमधील होणाया निवडणुकांचे अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमणेत आलेला होता. पोलीस ठाणे हद्दीमधील सर्व निवडणुका शांततेत पार पाडून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही.
3) भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये इतर आंदोलने शांततेत पार पाडून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही.
4) भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये साजया होणाया छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती, बसवेश्वर महाराज जयंती, त्याचबरोबर इतर महापुरूषांच्या जयंतीचे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीमध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमुन कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणेत आली.
5) भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमधील अंकलखोप, माळवाडी, नागठाणे गावांमध्ये मोठ¬ा प्रमाणात यात्रा भरत असतात. सदर गावांमध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमुण सर्व यात्रा सुरळीत पार पाडण्यात आल्या. कोणत्याही ठिकाणी वाद-विवाद निर्माण झाले नाहीत.
6) भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये श्री.क्षेत्र औदुंबर याठिकाणी श्री.दत्त जयंती, महाशिवरात्री, गुरूपोर्णिमा निमित्ताने मोठ¬ा प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. श्री.क्षेत्र औदुंबर परिसरामध्ये वाहतुकीचे नियमन तसेच पायी पेट्रोलिंग, दर्शन रांग सुव्यवस्था या सर्व गोष्टींचे नियोजन करून भाविकांची गैरसोय होणार नाही तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेणेत आली.
7) पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवस व रात्रपाळी दरम्यान प्रभावी पेट्रोलिंग करून पोलीस ठाणे हद्दीमधील वाहतुकीचे नियमन, वाहतुकीची कोंडी कमी करणे, चोरींना आळा बसविण्याचे दृष्टीकोनातुन पेट्रोलिंग, तसेच पोलीस ठाणे हद्दीमधील वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करून गुन्ह्रांना प्रतिबंध करणेचा प्रयत्न करणेत आला.
8) प्रत्येक गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचेशी चर्चा करून गावामध्ये होणाया चोरींना आळा बसविणेचे दृष्टीकोनातुन प्रत्येक गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणेबाबत वेळोवेळी सुचना देऊन त्याचा पाठपुरावा केलेने पोलीस ठाणे हद्दीमधील भिलवडी स्टेशन, भिलवडी, सुखवाडी गावांमध्ये कॅमेरे बसविणेत आलेले आहेत.
9) भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये वाहतुक अंमलदार नेमुन रहदारीच्या ठिकाणी तसेच मुख्य चौकामध्ये, बाजारपेठेच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होवून नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेणेत आली.
10) भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमधील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालयांमध्ये वेळोवेळी भेटी देऊन विद्यार्थी-विद्यार्थींनी यांना कायदेविषयक, स्पर्धा परिक्षेविषयी, समाजात वावरणेबाबत मार्गदर्शन करणेत आले. तसेच विद्यार्थीनींना सेल्फ डिफेन्सबाबत मार्गदर्शन करणेत आले. तसेच विद्यार्थींनींना आई-वडिल, शिक्षक, मोठ¬ा व्यक्ती यांचेशी सौजन्याने वागणेबाबत मार्गदर्शन करणेत आले.
11) भिलवडी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचेशी वेळोवेळी संवाद साधून त्यांचे अडी-अडचणींबाबत माहिती घेवून त्यांचे निरसन करणेत आलेले आहे. तसेच पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांचेशी मैत्रीपुर्ण संबंध ठेवून सर्वांना सोबत घेवून त्यांचेकडून एकजुटीने कामे करवून घेतलेली आहेत.
12) सपोनि भगवान पालवे यांचे कार्यकालामध्ये भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्ह्रांचे प्रमाणामध्ये घट झालेली दिसून आलेली आहे.
भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी भिलवडी आणि परिसरातील गावांमध्ये आपल्या सहकारी पोलिस कर्मचारी यांच्या साहाय्याने दमदार कामगिरी केली आहे. अशा दिलदार आणि गोड स्वभावाच्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली पुणे येथे होत आहे. ही गोष्ट भिलवडी आणि परिसरातील गावांसाठी दुखःची असणार आहे. परंतु दुःख बाजूला ठेवून भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणं आपलं कर्तव्य समजलं पाहिजे.