दर्पण न्यूज पलूस भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने 1 जून 2026 रोजी 78वा वाचन कट्टा मी वाचलेले सुधा मूर्ती यांचे साहित्य या विषयावर झाला.
अध्यक्ष स्थानी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीशजी चितळे होते. प्रारंभी वाचन कट्टा संयोजक आणि वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून वाचन कट्टा उपक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. या वाचन कट्ट्यावर ह.रा.जोशी डी.आर.कदम जयंत केळकर पुरुषोत्तम जोशी हनुमंत शिंदे रमेश चोपडे उर्मिला डिसले वहिनी सुभाष कवडे ग्रंथपाल मयुरी नलवडे यांनी सुधा मूर्ती यांच्या साहित्याचा परिचय करून देणारे तसेच काही कथांचे सादरीकरण केले. गिरीश चितळे यांनी सुधा मूर्ती यांच्या द्वंद्व कथेतील विचारांचे द्वंद्व स्पष्ट केले प्रारंभी सुमन कल्याणपुर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . यावेळी वाचन कट्ट्याचे सभासद वाचक बहुसंख्येने उपस्थित होते ह. रा. जोशीआणि हनुमंतराव शिंदे यांनी वाचनालयास ग्रंथ भेट दिली. भिलवडी पोलीस स्टेशनचे ए पी आय भगवानराव पालवे साहेब यांच्या बदली निमित्त त्यांचा या वाचन कट्ट्यावर वाचनालयाचे वतीने ग्रंथ भेट देऊन अध्यक्ष माननीय गिरीशजी चितळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालवे साहेबांनी वाचनालयाच्या आदर्श कामकाजाचे कौतुक केले. ग्रंथपाल मयुरी नलवडे यांनी आभार मानले.