दर्पण न्यूज कोल्हापूर :- आगामी गोकुळ दूध संघाची निवडणूक छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी या नावाने महायुती म्हणून एकत्रित लढवण्याच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली.
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब, पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर साहेब, खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार मा. विनय कोरे साहेब, आमदार मा. अमल महाडिक , जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. समित कदम यांच्या समवेत बैठकीमध्ये निवडणुकीतील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.