दर्पण न्यूज मिरज / सांगली : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गुरूवार, दि. 23 एप्रिल 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दिनांक 23 ते 25 एप्रिल 2026 रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दि. 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली, वारणाली वसाहत, सांगली येथे आगमन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 अंतर्गत उपक्रमास उपस्थिती. दुपारी 12.15 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व महसूल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्राप्त लॅपटॉप व प्रिंटर्सचे ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकारी यांना प्रातिनिधीक वितरण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 1.15 वाजता आयुक्त, सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका यांच्यासमवेत चर्चेसाठी राखीव, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 1.45 वाजता जिल्हाधिकारी सांगली यांच्यासमवेत चर्चेसाठी राखीव, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 2.30 वाजता पोलीस अधीक्षक सांगली यांच्यासमवेत चर्चेसाठी राखीव, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 3.15 वाजता सांगली येथून इचलकरंजी, जि. कोल्हापूरकडे प्रयाण. रात्री 7.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार, दि. 24 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता मिरज येथून कवठेमहांकाळकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता शिंदे पॅलेस बँक्वेट हॉल, देशिंग रोड, कवठेमहांकाळ येथे आगमन व शिंदे पॅलेस बँक्वेट हॉलच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. सकाळी 10.45 वाजता कवठेमहांकाळ येथून सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते जिल्हास्तरीय समिती बैठक, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपाारी 1 वाजता जिल्हास्तरीय पालक जनआरोग्य संरक्षण कार्यकारिणी समिती बैठक, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 1.30 वाजता ताकारी, टेंभू, म्हैसाळ प्रकल्प सिंचन व्यवस्थापन आढावा आणि विस्तारीत म्हैसाळ योजना व विस्तारीत टेंभू योजना कामकाज सद्यस्थितीचा आढावा, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे राखीव. दुपारी 3 वाजता शासकीय बैठकांकरिता राखीव, स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय सांगली. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शनिवार, दि. 25 एप्रिल 2026 रोजी शासकीय विश्रामगृह मिरज येथे राखीव. दुपारी 2 वाजता मिरज येथून पुणेकडे प्रयाण.