दर्पण न्यूज पलूस भिलवडी :-दिनांक ०४.०४.२०२२ रोजीपासून आजपावेतो खाजगी सावकार दौलत शंकर पाटील रा. भिलवडी, ता. पलुस व धनंजय शंकर चोथे रा. अंकलखोप, ता. पलुस यांचेकडे सावकारीचा कोणताही परवाना नसुन त्यांचेकडून यातील वर्दीदार यांनी ५ टक्के व १० टक्के व्याजाने फोन पे द्वारे ऑनलाईन स्वरूपात एकुण २१,२९,५००/- रु रक्कम घेतलेली असून त्याची परतफेड करणेपोटी वर्दीदार यांनी वरील दोन्ही खाजगी सावकारांना ऑनलाईन स्वरूपात फोन पे द्वारे एकुण १७,६४,२०५/- रू मुद्दल व व्याजाचे स्वरूपात तसेच रोख स्वरूपात एकुण अंदाजे २०,००,०००/- रू रक्कम मुद्दल व व्याजाचे स्वरूपात परत केलेली आहे. वरील दोन्ही खाजगी सावकार यांचेकडे सावकारीचा कोणताही परवाना नसताना त्या दोघांनी संगणमत करून वर्दीदार यांचेकडून घेतलेल्या रक्कमेपेक्षा दुप्पट रक्कम मुद्दल व व्याजाचे स्वरूपात परत करून सुद्धा मुद्दल येणे बाकी आहे असे म्हणून वर्दीदार यांना मानसिक त्रास देत असत. यातील खाजगी सावकार हे वर्दीदार यांचे व्यवसायाचे ठिकाणी व घरी येवून दमदाटी करित असतात. तसेच तु घेतलेले पैसे परत द्यायला जमत नसतील तर तुझी गाडी व घर नावावर कर असे म्हणून वर्दीदार यांना दमदाटी करून बेकायदेशीर सावकारकी केली आहे म्हणून वगैरे मजकुराची वर्दी अमोल राजेंद्र जंगम वय २९ वर्षे, व्यवसाय टी.व्ही. रिपेअरिंग व विक्री व्यवसाय, रा. भिलवडी, ता. पलुस, जि. सांगली यांनी दिलेने यातील खाजगी सावकार दौलत शंकर पाटील रा. भिलवडी, ता. पलुस व धनंजय शंकर चोथे रा.अंकलखोप, ता. पलुस याचेविरोधात दिनांक २१.०४.२०२६ रोजी भिलवडी पोलीस ठाणे सीसीटीएनएस गुरनं ५५/२०२६ महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९,४५ व भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५१ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा. सपोनि भगवान पालवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे हे करित आहेत.