दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने गुढीपाडव्यानिमित्त सभासद वाचक व ग्रामस्थ बंधू भगिनी यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्ष स्थानी गिरीश चितळे होते ज्येष्ठ संचालक जयंत केळकर यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत प्रास्ताविक केले. यावेळी संभाजी महिंद प्राध्यापक डॉक्टर महेश पाटील आणि महावीर नवले यांनी वाचनालयास 3000 रुपयांची रोख देणगी दिली जयंत केळकर यांनी समई तांब्या भांडे ग्लास अशा गरजेच्या वस्तू वाचनालयास भेट दिल्या यावेळी पुरुषोत्तम जोशी प्राध्यापक महेश पाटील महादेव जोशी यांनी मनोगते व्यक्त व्यक्त केली उपाध्यक्ष डी आर कदम यांनी वाचनालयाच्या उपक्रमांबाबत विस्ताराने माहिती दिली तर कार्यवाह सुभाष कवडे यांनी वाचन कट्टा उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली यावेळी गिरीश चितळे मार्गदर्शन करताना म्हणाले की ए .आय.च्या जमान्यात पुस्तकांचे वाचन हरवता कामा नये वाचनालयांच्या इमारतीचे विस्तारीकरणही करण्याचा मानस आहे अभ्यासिकेचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा हनुमंतराव डिसले यांनी आभार मानले यावेळी विश्वस्त जी जी पाटील डॉक्टर उदय कुलकर्णी वाचनालयाचे सर्व संचालक वाचक सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोजन ग्रंथपाल मयुरी नलवडे लेखनिक विद्या निकम माधव काटिकर यांनी केले.