सुखवाडी येथे भिलवडी जि प गटातील उमेदवार प्रतीक पाटील, वसगडे प स गणातील उमेदवार शोभा हजारे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
भिलवडी, वसगडे, सुखवाडीसह अनेक गावांतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग




दर्पण न्यूज भिलवडी /पलूस :-; नुकत्याच जाहीर झालेल्या सांगली जिल्हा परिषद आणि पलूस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. भिलवडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे प्रतीक पाटील, वसगडे पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शोभा हजारे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रचारासाठी अनेक गावातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला ,युवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी जिल्हा परिषद गट आणि वसगडे पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी गावागावात प्रचाराला सुरुवात केली आहे.
भिलवडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रतीक पाटील आणि वसगडे पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शोभा हजारे यांनी सुखवाडी येथील गावामध्ये घरोघरी प्रचार सुरू केला आहे. हा प्रचार सुरू असताना लोकांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरभरून प्रतिसाद दिला. या प्रचारासाठी दरम्यान भिलवडी, वसगडे, खटाव, सुखवाडी , ब्रम्हनाळ आणि इतर गावांतील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




