सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन

दर्पण न्यूज मिरज/सांगली : – थोर कवी बंकिमचंद्र चटर्जी रचित ‘वंदे मातरम’ या गीत रचनेला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वंदे मातरमचे सामूहिक गायन केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, रघुनाथ पोटे, विवेक काळे, सविता लष्करे, विजया यादव, उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, रणजीत भोसले, उत्तम दिघे, अजयकुमार नष्टे, श्रीनिवास अर्जुन यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ‘वंदे मातरम’ या राष्ट्रभावना जागवणाऱ्या गीताचे एकसुरात सामूहिक गायन करण्यात आले.
भारत भूमीच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्व भारतीयांची प्रेरणा ठरलेले वंदे मातरम् हे राष्ट्रीय गान आजही प्रत्येक भारतीयाचे ऊर्जा स्त्रोत आहे. या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने जिल्ह्यात विविध ठिकाणी भारत मातेच्या स्तुतीचा हा गौरव दिन सोहळा घेण्यात आला.


