सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे योग दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद

दर्पण न्यूज भिलवडी :– सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे 21 जून योग दिनाच्या निमित्ताने भक्ती योग हा विशेष योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हे केंद्र क्रमांक 29 होते यावेळी उपस्थित सर्व सभासद महिलांनी बहुसंख्येने सहभाग घेतला वाचनालयात महिलांनी तर ऐतिहासिक कृष्णा घाटावर पुरुष सभासदांनी योगासनात सहभाग घेतला माननीय अध्यक्ष गिरीश चितळे यांचे मार्गदर्शनाखाली हा भक्तीयोग कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला डॉक्टर रूपाली वाळवेकर यांनी उपस्थित महिलांकडून योगासने करून घेतली वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता संयोजन कार्यवाह सुभाष कवडे ग्रंथपाल मयुरी नलवडे प्रमुख लेखनिक विद्या निकम सेवक माधव काटीकर यांनी या उपक्रमाचे संयोजन केले, गजानन माने यांनी हा भक्तीयोग कार्यक्रम लाईव्ह ग्रामस्थांना उपलब्ध करून दिलेला होता