मिरज पूर्व भागात काँग्रेसला भगदाड ; जनसुराज्य पक्षात प्रवेश सुरूच, लवकरच जनसुराज्य पक्षाचा मेळावा : प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम

दर्पण न्यूज मिरज :- मिरज पूर्व भागात काँग्रेस पक्षावर तीव्र नाराजी, सोनी आणि करोली एम काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश सुरूच आहे. लवकरच पक्ष मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी दिली.
मिरज पूर्व भागात काँग्रेस पक्षाला भगदाड पडले असून वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत असलेले पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकून जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू असून त्याच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात आहेत. मिरज तालुक्यातील सत्ता धारी आणि आजी माजी ग्रामपंचायत सदस्य यांचा पक्ष प्रवेश सुरू असून आज सोनी आणि करोलि एम येथील काँग्रेस पक्षाचे नेते भानुदास पाटील सोनी गावचे माजी उपसरपंच दीपक कांबळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नयन लोखंडे समवेत सौंदडे रोहित सौंदडे अनिल सौंदडे अनिल कांबळे सुशील कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी
मिरज ग्रामीणचे नेते अरविंद पाटील सांगली जिल्हा अध्यक्ष आनंदसागर पुजारी डॉ पंकज म्हेत्रे जयसिंग तात्या चव्हाण सुरेश आबा इंगोले विनायक शेरबंदे विनायक रुईकर यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांना न्याय दिला जाईल तसेच लवकरच जनसुराज्य शक्ती पक्षाचा भव्य मेळावा घेणार असल्याची माहिती जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांनी दिली.