भिलवडी येथे उद्योजक स्व.काकासाहेब चितळे यांच्या जयंतीनिमित्त १०८ जणांचे रक्तदान

दर्पण न्यूज भिलवडी :-
सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील उद्योजक स्व.काकासाहेब चितळे यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त जानकीबाई चितळे हॉलमध्ये १०८ जणांनी रक्तदान केले. आदर्श ब्लड बँकेने त्याचे संकलन केले.
सकाळी भिलवडी स्टेशन येथील चितळे डेअरी कॅम्पस, सार्वजनिक वाचनालयात काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उद्योजक गिरीश चितळे यांच्याहस्ते रक्तदान शिबीर व पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास चितळे डेअरीत शास्त्रीय ते सुगम संगीताचा कार्यक्रम झाला. पं. रघुनंदन पणशीकर यांनी गायन केले.
उद्योजक मकरंद चितळे, विश्वास चितळे, श्रीपाद चितळे, अनंत चितळे, शशिकांत कुलकर्णी, जायंटसचे अध्यक्ष महावीर चौगुले, सुबोध वाळवेकर, शिवाजी कुकडे, विनायक चौधरी, दत्ता उतळे, चंद्रकांत पाटील, बाहुबली चौगुले
व जायंट्सचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.