

दर्पण न्यूज भिलवडी :- पलूस तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्राइमरी अँड हायस्कूल भिलवडीने घवघवीत यश मिळवले आहे.
दिनांक 7 व 8 रोजी 14 ,17 व ,19 वर्षे खालील मुले व मुली यांच्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये एकूण 17 शाळांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून भिलवडी शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ लींना वहिनी चितळे लाभल्या या कार्यक्रमासाठी सहसचिव श्री के डी पाटील सर , सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक श्री मोरे सर केजी विभागाच्या मुख्याध्यापिका माने मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे उपस्थितीत होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक श्री एम आर पाटील सर यांनी केले तर आभार क्रीडा शिक्षक सुनील ऐतवडे सर यांनी मानले या स्पर्धेमध्ये एकूण 17 शाळांनी सहभाग नोंदवला होता इंग्लिश प्राइमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 14 ,17 वर्षे मुले व 17 वर्षे मुली या तिन्ही संघाची फायनल मध्ये बाजी मारून जिल्ह्यासाठी निवड झाली या सर्व मुलांचे संस्थेचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,विश्वस्त ,सचिव सहसचिव ,विभाग प्रमुख व शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. विद्या टोणपे व क्रीडा शिक्षक सुनील ऐतवडे सर यांचे मार्गदर्शन लाभले या स्पर्धेचे नियोजन श्री आर आर हिरूगडे सर मुकुंद काटवटे ,धीरज सूर्यवंशी ,प्रशांत धोतरे यांनी केले



