महाराष्ट्र
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे ग्रंथ पूजन, सरस्वती पूजन, दिवाळी अंक उपक्रमाचा शुभारंभ
गायत्री चितळे यांचे हस्ते सरस्वती पूजन, वाचनालयाचे अध्यक्ष उद्योगपती गिरीश चितळे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन


: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे विजयादशमी दशमी निमित्त सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे ग्रंथ पूजन सरस्वती पूजन व दिवाळी अंक उपक्रमाचा शुभारंभ असा सोहळा संपन्न झाला. गायत्री चितळे यांचे हस्ते सरस्वती पूजन आणि वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले.
स्वागत प्रास्ताविक कार्यवाहक सुभाष कवडे यांनी केले.गिरीश चितळे यांनी विजयादशमीच्या सर्व वाचकांना शुभेच्छा देऊन दिवाळी अंक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.ज.कृ.केळकर यांनी आभार मानले.
यावेळी जी जी पाटील, हणमंतराव डिसले , प्रदीप शेटे व वाचक बहुसंख्येने उपस्थित होते. याचवेळी वाचनालयाचे सक्रिय सभासद असणारे संजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथ भेट देऊन शुभेच्छा दिल्या.


