न्यू इंग्लिश स्कूल टाकळीभान येथे कर्मवीर जयंतींचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

दर्पण न्यूज टाकळीभान :रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ . कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा विद्यालयात संपन्न झाला . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध शिवव्याख्याते नवाज शेख उपस्थित होते .तर व्यासपीठावर अशोक कारखान्याचे संचालक, विद्यालयाचे देणगीदार शनैश्वर पवार ,लक्ष्मी माता मिल्कचे सर्वेसर्वा बाबासाहेब चिडे ,स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राहुल पटारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकुमार जाधव ,मार्केट कमिटीचे संचालक दशरथ पिसे, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम. शिंदे पर्यवेक्षक एस. एस . जरे, सोसायटीचे मा . चेअरमन एकनाथ पटारे,आर . बी . एन . बी. कॉलेजचे प्रा . के .एस . महाले,प्रा . कार्लस साठे,धनश्री ॲग्रोचे संजय पटारे, पत्रकार दिलीप लोखंडे, अशोक रणनवरे, अर्जुन राऊत, बाळासाहेब दुधाळे , भाऊसाहेब जाधव, कंकरभाई बागवान, बाबासाहेब येळे,बाळासाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील
, त्यागमूर्ती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील व स्वर्गीय अण्णासाहेब पटारे पाटील यांच्या प्रतिमेचे सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले .यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सिंहाचा वाटा असून त्यांचे कार्य आजच्या विद्यार्थ्यांनी विसरू नये .प्रमुख वक्ते नवाज शेख म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुले आज देशाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रामध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत .टाकळीभान हायस्कूल मध्ये राबवत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल त्यांनी विद्यालयाचे कौतुक केले .लक्ष्मी माता मिल्कचे सर्वेसर्वा बाबासाहेब चिडे यांनी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा व आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन केले .यावेळी आर . बी. एन . बी . कॉलेजचे प्रा . के.एस . महाले यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली .यावेळी अशोक कारखान्याचे संचालक शनैश्वर पवार ,धनश्री ॲग्रोचे संजय पटारे ,कु प्रतिक्षा गिते,कु .आदिती पटारे यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी विद्यालयामध्ये राबवत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल व क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल टाकळीभानच्या पत्रकार बांधवांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम .
शिंदे व क्रीडाशिक्षक एस .एस .राठोड यांचा सत्कार केला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती डी . ए . पांढरे ,श्रीमती एम .ए . पाचपिंड यांनी तर आभार संदीप जावळे यांनी व्यक्त केले .कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व सेवकांनी सहकार्य केले .


