उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या श्री नाथ केसरी” बैलगाडी शर्यत स्पर्धेला भेट
शिवसेना बैलगाडी शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन

दर्पण न्यूज कवठेमहांकाळ /सांगली : राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार, दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 9 नोव्हेंबर रोजी हेलिकॉप्टरने दुपारी 1.45 वाजता कोड्याचे माळ मैदान हेलिपॅड, ता. कवठेमहांकाळ येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता शिवसेना बैलगाडी शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन व “श्री नाथ केसरी” बैलगाडी शर्यत स्पर्धा, स्थळ – बोरगाव, कोड्याचे माळ, तासगाव-कवठेमहांकाळ रोड, जि. सांगली. दुपारी 3.30 वाजता मोटारीने कोड्याचे माळ मैदान हेलिपॅड, बोरगावकडे प्रयाण. दुपारी 3.40 वाजता कोड्याचे माळ मैदान हेलिपॅड, बोरगाव येथे आगमन व हेलिकॉप्टरने मजले हेलिपॅड, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूरकडे प्रयाण.
पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांचा सांगली जिल्हा दौरा
दर्पण न्यूज सांगली : राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाईहे रविवार, दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 9 नोव्हेंबर रोजी हेलिकॉप्टरने दुपारी 2 वाजता बोरगाव, कोड्याचे माळ, तासगाव-कवठेमहांकाळ रोड जि. सांगली येथे आगमन व शिवसेना बैलगाडी शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन व “श्री नाथ केसरी” बैलगाडी शर्यत स्पर्धेस उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता मोटारीने कोड्याचे माळ मैदान हेलिपॅड, बोरगावकडे प्रयाण (मा. उप मुख्यमंत्री महोदयांसमवेत). दुपारी 3.40 वाजता कोड्याचे माळ मैदान हेलिपॅड, बोरगाव येथे आगमन व हेलिकॉप्टरने मजले हेलिपॅड, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूरकडे प्रयाण.


