अंकलखोप येथील शिवव्याख्याते प्रा.प्रशांत पाटील यांना ‘हिंदुरत्न’ पुरस्कार


दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. प्रशांत पाटील यांना नीती आयोग भारत सरकार दिल्ली संलग्नित मनिभाई मानव सेवा ट्रस्ट व डॉ. रवींद्र भोळे आरोग्य केंद्र, उरळी कांचन ता. हवेली जि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. प्रशांत पाटील हे शिव व्याख्यानातून गेली 25 वर्ष समाजप्रबोधन करीत आहेत. महाराष्ट्रातील गड किल्ले व त्याचे संवर्धन करण्यासाठी सातत्याने ते आपल्या व्याख्यानातून शिवरायांचा विचार व आचार व हिंदू धर्म संहिता याचा प्रचार व प्रसार करीत आहेत.
यावेळेला पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी खासदार मेधाताई कुलकर्णी, वारकरी मंच पलूस तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, हिंदुरत्न डॉ. रवींद्र भोळे व उपस्थित मान्यवर यांच्या शुभहस्ते हा संपन्न करण्यात आला.


