देश विदेशमाहिती व तंत्रज्ञान

सिलीन’ हा चित्रपट तुर्कीमधील बालमजुरी आणि बालविवाहाची समस्या जागतिक मंचावर मांडण्याचा प्रयत्न करतो: दिग्दर्शक तुफन सिमसेकन

गोवा/पणजी : अभिजीत रांजणे :-

 

“हा चित्रपट बनवण्याची प्रेरणा ग्रामीण  तुर्कस्तान मधील लहान मुलींच्या गरीब स्थितीतून आली आहे. तिथे त्यांना शेतात काम करण्यास भाग पाडले जाते आणि लहान वयातच त्यांचे लग्न केले जाते” असे  सीलिन या टर्की चित्रपटाचे दिग्दर्शक तुफन सिमसेक्कन  म्हणाले. 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला जिथे तो जागतिक चित्रपट श्रेणी अंतर्गत प्रदर्शित केला जात आहे.

पत्र सूचना कार्यालयाद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, सिमसेक्कन म्हणाले , “बालमजुरी आणि बालविवाह यांसारख्या प्रथांमुळे ग्रामीण तुर्कस्तान मधील महिलांचे आयुष्य कमी होत आहे. मला ही समस्या जागतिक मंचावर सोडवायची आहे कारण ती जगाच्या इतर भागांमध्येही आहे.

चित्रपट बनवताना सामोरे जावे लागलेल्या आव्हानांवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिमसेक्कन म्हणाले की, चित्रपटातील कलाकार आणि पात्रांचा वापर करून चित्रपटाचे सार समोर आणणे ही त्यांच्यासाठी एक उत्साहवर्धक प्रक्रिया होती. “मला हंगेरियन दिग्दर्शक आणि मुलांसोबत काम करण्याच्या त्यांच्या दृष्टीकोनाबद्दल कुतूहल  वाटते. हा चित्रपट बनवताना यातून खूप मोठी प्रेरणा मिळाली आहे,” असे ते म्हणले.

अधिक सविस्तरपणे सांगताना, सिमसेक्कन म्हणाले की तूर्क लोकसंगीत हा चित्रपटाचा एक आवश्यक घटक आहे आणि दर्शकांना तुर्क संस्कृतीची झलक दाखवतो.

निर्माते मेहमेट सरिका यांनी सांगितले की हा चित्रपट तुर्कस्तान मधील अनेक ग्रामीण भागांमध्ये मुलींच्या तीव्र शोषणाची समस्या मांडतो आणि स्त्री-पुरुष समानतेच्या संकल्पनेशी संबंधित आहे. “चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान आम्हाला लैंगिक समानतेबाबत जनजागृती करणाऱ्या  स्वयंसेवी संस्थांसोबत अनेक कार्यक्रमांवर काम करण्याची संधी मिळाली.”

सिलीन हा चित्रपट सिलीन नावाच्या चौदा वर्षांच्या नायिकेवर आधारित आहे, जी  तंबूच्या शहरात राहणारी  हंगामी शेतमजूर आहे. शाळेत जाण्याचे तिचे एकमेव स्वप्न आहे, जे अशक्य आहे हे तिला माहीत आहे. बिल्गे नावाचा एक माहितीपट दिग्दर्शक तंबूच्या शहरात येतो आणि यामुळे सीलिन आणि संपूर्ण समुदायाला प्रभावित करणारी परिवर्तनात्मक घटना घडते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!