ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वसगडे येथील बेकायदेशीर भंगार चोरीप्रकरणातील दोषीवर कारवाई करा ; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार : माजी सरपंच श्रेणीक पाटील

बेकायदेशीर भंगार चोरीचा विद्यमान, सत्ताधारी ग्रामपंचायतीवर विरोधकांचा आरोप

 

भिलवडी :
वसगडे ग्रामपंचायतीचे गेली सात महिने झाले बेकायदेशीर भंगार चोरीप्रकरणी दोषीवर कारवाई करण्यासाठी पंचायत समिती पदाधिकारी दिरंगाई करीत आहेत. या भांगर चोरीप्रकरणी कारवाई संदर्भात अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन दिले आहेत. अद्याप कारवाई झाली नाही. आता मात्र मी आणि गप्प बसणार नाही, बेकायदेशीर भंगार चोरीप्रकरणी दोषीवर  त्वरित कारवाई करा, अन्यथा वसगडे येथे बेमुदत उपोषण करून तीव्र आंदोलन छेडणार, असा इशारा माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रेणीक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
भिलवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत वसगडे गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य म्हणाले, की सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पलूस तालुका गटविकास अधिकारी यांच्याकडे भंगार विक्री करणाऱ्या वर कारवाई व्हावी याची मागणी केली असता त्यांच्यावर कारवाई झाली नाही . संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी गटविकास अधिकारी यांनी वसगडे ग्रामपंचायतला सूचना दिल्या आहे. भिलवडी पोलिस ठाण्यास गुन्हा दाखल झाला आहे की नाही हे समजू शकले नाही .
श्रेणीक पाटील पुढे म्हणाले, की गेले आठ महिने झाले हे प्रकरण चिघळत निघालेले आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिलेले नाही या प्रकरणात प्रशासनावर राजकीय दबाव आहे की काय अशी शंका व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत मधील बेकायदेशीर भंगार विक्रीची रक्कम मोठी असून  विद्यमान सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मंडळ यांनी किरकोळ रक्कम कर्मचाऱ्यांच्या कडून भरून घेऊन त्यांना माफ करण्याच्या उद्देशाने हालचाली करीत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्याचे काम सरपंच ,उपसरपंच व सदस्य मंडळ करीत आहे .खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर भंगार विक्री करण्यास कोणताही अधिकार नसतो परंतु त्या कर्मचाऱ्यांना  विक्री करण्यास भाग पाडले आहे. सदर कर्मचारी दोषी नसून सरपंच उपसरपंच दोषी असल्याचे निदर्शनास आले आहे, तरी संबंधित भंगार विक्री करणाऱे सत्ताधारी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मंडळावर कारवाई. कायद्यानुसार हे चुकीची आहे.त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य बॉडी बरखास्त करावी ,अशीही मागणी माजी सरपंच श्रेणीक पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

भंगार विक्री प्रकरणात मागासवर्गीय कर्मचारी यांना गोवण्यात आले आहे.  मागासवर्गीय लोकांवरील अन्याय खपवून घेणार नाही, संबंधित विद्यमान ग्रामपंचायत सत्ताधारी समितीवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य तथा बहुजन वंचित आघाडीचे पदाधिकारी अनिल सावंत यांनी केली.

2010 ते 2011 पासून ग्रामपंचायतीने डेस्कटॉप रजिस्टर सत्ताधारी बॉडीने व ग्रामसेवक यांच्या संगणमताने गहाळ केले आहे. त्यामुळे भंगार विक्रीची निश्चित रक्कम सांगता येत नाही,  हा आकडा दोन ते तीन लाखांवर जाण्याची शक्यता आहे, असे माजी उपसरपंच नारायण खटावकर यांनी सांगितले.

यावेळी अनेकांनी बेकायदेशीर भंगार विक्री प्रकरणातील मुख्य असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

या पत्रकार परिषदेला वसगडे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रेणिक पाटील ,माजी ग्रामपंचायत सदस्य धन्यकुमार पाटील,संजय पवार, नामदेव जाधव माजी तंटामुक्ती अध्यक्ष वसगडे,रावसाहेब पाटील, सुरज पवार, नारायण खटावकर, संजय पाटील, अनिल सावंत, प्रफुल्ल सावंत, युवराज यादव, संतोष सावंत, शिवाजी कोळी आदींसह वसगडे ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!