क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भिलवडी परिसरातील अनेकांनी घेतली अन्न व औषध प्रशासनाची धास्ती : दुकाने बंद ; गुपचूप विक्री

दर्पण न्यूज चा इफेक्ट : पोलिसांची बघ्याची भूमिका

भिलवडी : सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांच्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी २२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री संदर्भात जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या पान शॉपवर धाडी टाकून एफआयआर दाखल केले.  15 ठिकाणी धाडी टाकून माल जप्त केला. याबाबत भिलवडी येथेही धाडी टाकल्या जाणार असल्याचे संकेत “दर्पण न्यूज” ने दिले होते. बातमीची दखल घेत जवळच्या काही गावांमध्ये कारवाई करण्यात आली.  भिलवडी परिसरातील अनेकांनी  अन्न व औषध प्रशासनाची धास्ती घेतली आहे . अनेकांनी दुकाने बंद केली तर काहींनी गुपचूप विक्री सुरू ठेवली आहे. या बेकायदेशीर बाबीची जाणीव करून दिल्याबद्दल दर्पण न्यूज चा इफेक्टची नागरिकांनी चर्चा केली. मात्र, बरेच दिवस पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा विक्री सुरू होती. एन दिवाळीतही अशी विक्री करून लोकांच्या जीवाशी खेळले जात होते. मात्र, अन्न व औषध प्रशासन सांगली यांनी धडाकेबाज कामगिरी करीत 15 ठिकाणी धाडी टाकून माल जप्त केला.

शाळकरी मुलांचा विचार करून शालेय परिसरात प्रतिबंधित अन्न पदार्थांचविक्री होत असल्याने यांवरही कारवाई करण्यात यावी, पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता ठोस कारवाई करावी अशी मागणी लोकांतून होत आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!